>
Is Jesus the Only Way?

येशू हा स्वर्गाचा एकच मार्ग आहे का ?

ः ‘‘मी मुळात एक चांगला माणूस आहे, म्हणून मी स्वर्गात जाणार.’’ ‘‘बरे, मी काही वाईट कामे केली आहेत, पण मी चांगली कामे जास्त केली आहेत, म्हणून मी स्वर्गात जाणार.’’ ‘‘मी बायबलप्रमाणे जगत नाही म्हणून काही भगवंत मला नरकात पाठविणार नाही. काळ बदलला आहे !’’ ‘‘केवळ मुलांना पीडा देणारे आणि खुनी लोकच नरकात जाणार.’’


ह्या सर्व सामान्य समजूती आहेत, पण खरेतर ह्या सर्व थापा आहेत. सैतान, जो जगाचा राज्यकर्ता आहे, तो हे विचार आमच्या डोक्यामध्ये भरवित असतो. तो, आणि जो कोणी त्याचा मार्ग अनुसरतो तो भगवंताचा शत्रू आहे (१ पीटर ५:८). सैतान फसवा आहे, आणि नेहमी स्वतः चांगला असल्याचा भासवित असतो (२ कोरिन्थियन्स ११:१४), पण जी भगवंताची नाहीत त्या सर्व मनांवर त्याचे नियंत्रण आहे. ‘‘ह्या युगातील भगवंताने अश्रद्धावानांची मने आंधळी बनविली आहेत, जेणेकरून ते ख्रिस्ताच्या शिकवणीचा प्रकाश पाहू शकत नाहीत, जो भगवंताचे प्रतिक आहे’’ (२ कोरिन्थियन्स ४:४).

भगवंत लहान पापांची काळजी करत नाही किंवा नरक ‘‘वाईट लोकांसाठी’’ आरक्षित आहे ह्यावर विश्वास ठेवणे थाप आहे. सर्व पापे आम्हांला भगवंतापासून दूर करतात, एक लहान शुद्ध थापसुद्धा. सर्वांनीच पाप केले आहे आणि कोणीही स्वतःच्या बळावर स्वर्ग गाठू शकत नाही (रोमन्स ३:२३). आमच्या चांगल्याचे वजन वाईटापेक्षा जास्त होते याच्यावर स्वर्गाची प्राप्ती आधारलेली नाही, तसे असेल तर आपण सर्वजण हरू. ‘‘आणि जर कृपेमुळे, ह्यानंतर आता कामांमुळे नाही, जर ते असेल, कृपा कृपा राहणार नाही’’ (रोमन्स ११:६). आम्ही आमचा स्वर्गाचा मार्ग मिळविण्यासाठी काहीच चांगले करू शकत नाही ( टाइटस ३:५).

‘‘अरूंद फाटकातून प्रवेश कर. कारण, रूंद फाटक आणि रूंद रस्ता विनाशाकडे नेत असतो, आणि अनेकजण त्याच्यातून प्रवेश करतात’’ (मॅथ्यू ७:१३). भगवंतावर श्रद्धा ठेवण्याची संस्कृती लोकप्रिय नाही अशा ठिकाणी जिथे सर्वजण पापाचे जीवन जगत आहेत त्यांचीसुद्धा भगवंत गय करणार नाही. ‘‘तुझ्यासाठी, तू तुझे अपराध आणि पापांमध्ये मरण पावला होतास, ज्यात जेव्हा तू ह्या जगाचे आणि हवेच्या शासकाचे, जो आत्मा आता अवज्ञाकारकांमध्ये काम करत आहे, त्यांचा मार्ग अनुसरत जगत होतास’’ (एफिसियन्स २:१-२).


जेव्हा भगवंताने जग निर्माण केले, ते एकदम योग्य आणि चांगले होते. नंतर त्याने आदम आणि इव्ह ह्यांना निर्माण केले आणि त्यांना त्यांची स्वतंत्र इच्छा दिली, जेणेकरून त्यांना भगवंताला अनुसरणे आणि आज्ञा मानणे किंवा नाही ह्याचा पर्याय असेल. पण सैतानाने त्यांना भगवंताची अवज्ञा करण्यासाठी मोहित केले, आणि त्यांनी पाप केले. त्यांनी त्यांना (आणि त्यांच्यानंतर आलेल्या आमच्यासह सर्वांना) भगवंताशी जवळचे नाते असण्यापासून दूर केले. तो एकदम योग्य आणि पवित्र आहे आणि त्याने पापाचा निवाडा केला पाहिजे. पापी ह्या नात्याने आम्ही आम्हांला स्वबळावर भगवंताशी परत जोडू शकलो नाही. त्यामुळे भगवंताने एक मार्ग निर्माण केला, जेणेकरून आम्ही त्याच्याबरोबर स्वर्गात एक होऊ शकू. ‘’भगवंत जगावर एवढे प्रेम करतो की त्याने त्याचा एकमात्र पुत्र जगाला दिला, जेणेकरून जो कोणी त्याच्यामध्ये विश्वास ठेवील तो नाश पावणार नसून चिरंतन जीवन प्राप्त करील’’ (जॉन ३:१६). ‘‘पापाची मजुरी मृत्यु आहे, पण येशू ख्रिस्त आमच्या प्रभूमध्ये चिरंतन जीवन ही भगवंताची देणगी आहे’’ (रोमन्स ६:२३). येशू जन्मला होता आमच्या पापांसाठी मरण पत्करण्यासाठी ज्यामुळे आम्हांला मरावे लागणार नाही. त्याच्या मृत्युनंतर तीन दिवसांनी तो कबरीतून वर आला (रोमन्स ४:२५), आणि स्वतःला मरणावर विजयी असल्याचे सिद्ध केले. त्याने मनुष्य आणि भगवंत यांच्यामध्ये सेतू बांधला ज्यायोगे विश्वास ठेवला तरच आम्ही त्याच्याशी वैयक्तिक नाते ठेवू शकू.

‘‘आता हे चिरंतन जग आहे, की ते तुला जाणू शकतात, केवळ खरा भगवंत, आणि येशू ख्रिस्त, ज्याला तू पाठविले आहेस’’ (जॉन १७:३). बहुतेक माणसे भगवंतावर विश्वास ठेवतात, सैतानसुद्धा. पण मोक्षप्राप्तीसाठी आम्ही भगवंताकडे वळले पाहिजे, वैयक्तिक नाते निर्माण केले पाहिजे, आमच्या पापांपासून दूर गेले पाहिजे, आणि त्याला अनुसरले पाहिजे. आमच्याकडे जे काही आहे आणि जे काही आम्ही करतो त्या सगळ्यांसह आम्ही येशूमध्ये विश्वास ठेवला पाहिजे. ‘‘भगवंताकडून हे सदाचरण येशूमध्ये विश्वास ठेवण्यातून त्या सगळ्यांना येते जे विश्वास ठेवतात. तिथे फरक नाही’’ (रोमन्स ३:२२). बायबल शिकविते की मोक्षप्राप्तीसाठी येशूशिवाय अन्य मार्ग नाही. जॉन १४:६ मध्ये येशू सांगतो, ‘‘मी मार्ग आणि सत्य आणि जीवन आहे. केवळ माझ्याद्वारेच कोणी पित्याजवळ येऊ शकतो.’’


येशू हा मोक्षप्राप्तीचा एकच मार्ग आहे कारण तोच एकमात्र आहे जो आमच्या पापांचा दंड भरू शकतो (रोमन्स ६:२३). पाप आणि त्याचे परिणाम याविषयी खोली आणि गांभिर्य अन्य कोणताही धर्म शिकवित नाही. अन्य कोणताही धर्म पापक्षालनाचे अगणित मार्ग पुरवित नाही जे येशू ख्रिस्त पुरवू शकतो. अन्य कोणताही ‘‘धर्मसंस्थापक’’ माणूस बनलेला भगवंत नव्हता (जॉन १:१,१४) - अगणित कर्ज फेडण्यासाठी एकमेव मार्ग. आमचे कर्ज फेडण्यासाठी येशूला भगवंत बनावे लागले. मरण पत्करण्यासाठी येशूला माणूस बनावे लागले. येशूमध्ये विश्वास ठेवल्यानेच मोक्षप्राप्ती होते ! ‘‘अन्य कोणामध्येही मोक्षप्राप्ती होत नाही, कारण स्वर्गाच्या खाली माणसाला दिलेले अन्य कोणतेही नाव नाही ज्याच्यामुळे आमचे रक्षण होईल’’ (एक्ट्स ४:१२).
AMAZING GRACE BIBLE INSTITUTE